Pimpri

पवना आणि इंद्रायणी नद्यांना नरेंद्र मोदींचे नाव द्या – राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी

By PCB Author

March 04, 2021

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी भाजप कडून गेल्या ४ वर्षात काहीही उपाय योजना झाल्या नाहीत. राष्ट्रवादी पदवीधरचे कार्यकर्ते यांनी नदीच्या व्यथा नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांच्या समोर मांडल्या. नद्यांनी गटाराचे स्वरूप घेतले आहे. जलपर्णी साठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च होतात तरीही नद्यांना गटारगंगेचे स्वरूप आले आहे.त्यामुळे निदान नरेंद्र मोदींचे नाव दिले तर नावासाठी का होईना काहीतरी काम होईल म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना पदवीधर संघातर्फे निवेदन देण्यात आले. पाटील यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्याने आयुक्त राजेश पाटील यांनीही हा विषय गांभिर्याने घेतला आहे.

यावेळी पर्यावरण अहवालावर सुद्धा चर्चा झाली, आणि तो फक्त कॉपी पेस्टचा माहिती अहवाल आहे असे माधव पाटील यांनी सांगीतले. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील , राष्ट्रवादी पदवीधर संघ शहर अध्यक्ष माधव पाटील , कार्याध्यक्ष युनूस शेख , भोसरी विधानसभा अध्यक्ष अभिजित घोलप आदी उपस्थित होते.