Pimpri

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपास पाच व्हेंन्टीलेटर

By PCB Author

May 27, 2021

पिंपरी,दि. 27 (पीसीबी) – कोरोना कोविड -19 या घातक व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार अहोरात्र काम करीत आहे. ज्या ठिकाणी संसाधनाचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या ठिकाणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिर्लेकर आणि पदाधिकारी प्रत्यक्ष मदत पोहचवित आहेत. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पाच व्हेंन्टीलेटर देण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेना संपर्क प्रमुख बाळाभाई कदम यांनी दिली.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले पाच व्हेंन्टीलेटर गुरुवारी (दि. 27 मे) शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड मनपास देण्यात आले. यावेळी बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, गटनेते राहुल कलाटे, शिवसेना शहर संघटीका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक घनंजय आल्हाट, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणीयार, कामगार नेते इरफान सैय्यद, निलेश हाके, श्रीनिवास आदमाने, नितीन गायकवाड, शुभम तेली, राहुल शर्मा, गणेश शितोळे आदी उपस्थित होते. आयुक्त राजेश पाटील व अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी हे व्हेंन्टीलेटर स्विकारले.