“परिस्थतीशी सामना करण्यासाठी आपल्या मुलांना लहानपणापासूनच धडे देणे आवश्यक”: अनुराधा गोरखे

0
301

पिंपरी, दि. १ (पीसीबी) : नगरसेविका श्रीमती.अनुराधा गोरखे यांचा औरंगाबाद येथे मातोश्री जिजाबाई सांभाळकर फाउंडेशन च्या वतीने *आदर्श माता म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ शाम शिरसाठ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. संजय सांभाळकर, प्रा. डॉ. सूर्यकांत सांभाळकर, प्रा. रेखा सांभाळकर, श्री. सुनील सांभाळकर (म. पोलिस) व श्री. संभाजी सांभाळकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्याप्रसंगी लेखक, दिग्दर्शक व अण्णा भाऊ साठे साहित्याचे अभ्यासक, पुणे मा. श्री. सुरेश कृष्णाजी पाटोळे, प्र. कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ. श्याम शिरसाट, प्रसिध्द साहित्यिक व समीक्षक तथा आंबेडकरी विचारवंत प्रोफेसर डॉ. ऋषिकेश कांबळे, संस्थापक सचिव वि. शि. प्र. मंडळ, औरंगाबाद मा. श्री. विजयजी राऊत, अध्यक्ष देवगिरी बँक तथा व्यवस्थापन परिषद सदस्य मा. श्री. किशोरजी शितोळे, संस्थापक गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र, औरंगाबाद डॉ. दिवाकरजी कुलकर्णी, अर्थतज्ञ तथा अण्णा भाऊ साठे साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. दिलीप अर्जुने, उपाध्यक्ष, देवगिरी बँक तथा सिनेट सदस्य प्रा. संजय गायकवाड, संस्थापक, क्रां. ल. सा. वि. प. श्री. उत्तम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.