पराभवामुळे पार्थ खचलेला नाही, विधानसभा लढण्याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजित पवार

539

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील पार्थच्या पराभवामुळे पवार कुटूंबियांना कोणताही धक्का बसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांच्या पराभवाचे जेवढे दुःख झाले. तेवढेच पार्थच्या पराभवाचे दुःख झाले, असे सांगून आम्ही पक्षात बळजबरी करत नाही, विधानसभा लढण्याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असे राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांनी आज (गुरूवार) येथे सांगितले.  

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील पार्थ पवारांच्या पराभव पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

यावेळी अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही  एक कुटुंब म्हणून राहतो. पक्षात कोणावरही बळजबरी केली जात  नाही. प्रत्येकाला स्वत:बाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. पार्थच्या पराभवामुळे पवार कुटूंबियांना कोणताही धक्का बसला नाही.  पक्षाच्या इतर उमेदवारांच्या पराभवाचे जेवढे दुःख झाले. तेवढेच पार्थच्या पराभवाचे दुःख झाले. मात्र, पराभवामुळे पार्थ खचलेला नाही. विधानसभा लढण्याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला  आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीची  तयारी सुरू केली आहे, असेही पवार यांनी सांगितले.