परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ; आणखी ‘एक’ खंडणीचा गुन्हा दाखल

0
188

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात घेला आहे. त्याच्यावरती आता खंडणीची मागणी आणि फसवणुक केल्याची तक्रार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याने त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. फक्त परमबीर सिंहच नाहीतर त्यांच्यासह आणखी ६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, संजय पूनमिया, सुनिल जैन अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर हा सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायिकाकडून गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. श्यामसुंदर अग्रवाल हे फिर्यादी असून ते एक बांधकाम व्यवसायिक आहेत. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसाकाला 15 कोटींच्या खंडणीसाठि धमकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यशिवाय महाराष्ट्र सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परमबीर सिंह यांची खुली चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांनी भागीदारीत मे. बालाजी एंटरप्राइज व मे. राजा रामदेव इंटरप्रायजेस नावाची कंपनी २००८ मध्ये सुरू केली होती. या दोन कंपन्यांद्वारे दोघांनी २००६ ते २०११ पर्यंत भागीदारीत व्यवसाय केला. माञ गुंतवणूकीतील नफा व हिशोबासह इतर कारणांवरून दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्याने ही भागीदारी २०११ मध्ये संपुष्ठात आली. माञ आरोप प्रत्यारोप यातून संजय पुनामिया यांनी अग्रवाल यांच्यावर मुंबईसह इतर जिल्हात अग्रवाल यांच्यावर १८ गुन्हे नोंदवले.

संजय पुनामिया यांनी २०१६ मध्ये त्यांचा मिञ मनसुखलाल गांधी यांच्या तक्रारीवरून अग्रवाल यांच्यावर ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यावेळी अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत होते. त्यावेळी पुनामिया याने त्याचा सहकारी सुनिल जैनने अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्याकडे त्यांचा हस्तक मनोज घोटकर याला पाठवले होते. घोटकरने पुनामिया हे परमबिर सिंह यांचे मिञ आहेत. ते परमबिर यांचे आर्थिक व्यवहार पाहतात. असे सांगितले. घोटकरने अग्रवाल यांना या गुन्ह्यांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी व नवीन गुन्हे नोंद होण्यापासून थांबवायचे असतील. तर संजय पुनामिया व परमबिर सिंह यांना संबधित जागा विकण्यास व १५ कोटी ५० लाख एवढ्या रक्कमेची मागणी केली. हे न केल्यास पुढची ५ वर्ष जेलमध्ये रहावे लागेल अशी धमकी दिली. त्यावेळी पुनामिया यांनी पोलिसांसाठी ही मोठ्या पैशांची मागणी केल्याचा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे.

दरम्यान ३० मार्च रोजी अग्रवाल यांची पून्हा संजय पुनामिया व घोटकर यांच्यात बैठक झाली. त्यावेळी संजय पुनामिया यांनी संबधित मालमत्तेच्या करारावर जबरदस्ती सह्या घेतल्या. त्यावेळी पुनामिया यांनी प्रकरण मिटले, माञ उपायुक्त अकबर पठाण यांना पैसे द्यावे लागतील असे सांगत, शरद अग्रवालला घेऊन अकबर पठाण यांच्या अंधेरीतील कार्यालयत गेले होते. त्यावेळी अकबर पठाण यांनी ५० लाखांची मागणी केली. तसेच भाईंदरमधील २ बीएचके फ्लँट नावावर करण्यास धमकावले. तसे न केल्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची धमकी दिल्याचे अग्रवाल याने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार परमबिर सिंह यांच्या घरी पुतण्या शरदने अग्रवाल व शुभम अग्रवाल यांची भेट घडवून दिली. त्यावेळी उपायुक्त दर्जाचा अधिकरी हे देखील उपस्थित होता. अटक टाळण्यासाठी अग्रवाल यांनी पुनामियाला १५ कोटी ५० लाखांचा धनादेश व २५-२५ लाख दोन हप्त्याने अग्रवाल यांचा कर्मचारी देवेंद्र पांचाळ यांच्याकडून पुनामिया यांच्याकडे पाठवले. त्यानंतर पुनामिया अग्रवाल याला एसीपी श्रीकांत शिंदेकडे घेऊन गेले. मोक्का गुन्ह्यात मदतीसाठी श्रीकांत शिंदेंना २५ लाख देण्यासाठी दटावले. त्यानुसार अग्रवालने २५ एप्रिल २०२१ ला ते पैसे संजय पुनामिया यांच्याकडे दिले. त्यानंतर परमबिर सिंह व पुनामिया यांच्यात झालेल्या सेटलमेंट नुसार अग्रवाल यांच्यकडे ११ कोटींसाठी पुनामियाने तगादा लावला. यावेळी पुनामियाने पोलिसांचीही मदत घेऊन कुटुंबियांवर पाळत ठेवल्यचा आरोप केला आहे.

परमबिर सिंह हे मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरउपयोग करून अग्रवाल यांच्यावर त्यांनी अंडरवल्ड डाँन छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली मोक्कोचा गुन्हा नोंदवून अटकेची धमकी दिली. तसेच पुतण्याचे सही घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली. असा आरोप करण्यात आला आहे.