परभणीत महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
2498

वसमत, दि. १५ (पीसीबी) – महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना परभणीतील वसमत रोड दत्त धाम येथे घडली.

सचिन मिटकरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने महिलेने धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणीतील वसमत रोड येथील दत्त धाम येथे राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सचिनने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात सचिनने महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘त्या महिलेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझे लग्न झाले आहे हे तिला माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती. शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी ती महिला देत होती. त्या महिलेचे आणखी दोन तरुणांशी संबंध असून तिने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला. याला कंटाळून आत्महत्या करत आहे’, असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी परभणी पोलीस अधिक तपास करत आहेत.