परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

0
374

नवी दिल्ली,दि.१६(पीसीबी) – परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या पुलवामा हल्ल्यासंदर्भातील ट्विटला प्रत्युत्तर देत सुधीर गुप्ता यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका इटालियन महिलेसोबत एका भारतीय व्यक्तीचा विवाह केल्यामुळे कोणाला फायदा झाला. विवाहाचा निष्कर्ष राहुल गांधी आहेत. या विवाहाच्या चुकीसाठी कोण जबाबदार आहेत? असा सवाल करत सुधीर गुप्ता यांनी राहल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी, आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत आहोत. पण या सोबतच या हल्ल्यामुळे सर्वात जास्त फायदा कुणाचा झाला? या हल्ल्यासंदर्भातील चौकशीतून काय समोर आलं?, असा सवाल केला होता. याच टिकेला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिल आहे.

दरम्यान, सुधीर गुप्ता यांच्या या वक्तव्यावर अद्याप काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.