परदेशात उच्च शिक्षणाच्या निर्णयाचे काय ?

0
627

प्रतिनिधी,दि.१४ (पीसीबी) : कोरोना वायरसचा फटका जगभराच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांना आपल्या रोजगाराला मुकावे लागले आहे. तसेच अद्यापही कोरोना वायरसवर लस मिळाली नसल्याने यापुढेही या वायरसचा संसर्ग होणार हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोनासोब्त जगायला शिका असे आता जागतिक आरोग्य संघटनेनेच सांगितले आहे. या सर्वाचा विपरीत परिणाम विशेषकरून उच्च शिक्षण घेऊ इच्छ्चीत असलेल्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. शिक्षण संस्थांचे ग्लोबल राँकिंग करणारी संस्था क्वाॅकक्वरेल्ली साइमंड्स (क्यूएस) यांनी तयार केलेल्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या पार्श्भूमीवर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतलेल्या ४८.४६ % भारतीय विद्यार्थ्यांनी आपला निर्णय आता बदलला आहे. भारतातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण आपल्याच देशात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

क्यूएस संस्थेच्या तज्ञांनुसार अलीकडच्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेणे महाग झालेले आहे. त्यात कोरोनामुळे परदेशात शिक्षण झाल्यावर नोकरी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे परदेशात शिक्षण घेणे खर्चिक होईल व नोकरी देखील मिळणार नाही. क्यूएस संस्थेने ‘इंडियन स्टूडंट्स मोबिलिटी रिपोर्ट २०२० : इंपॅक्ट ऑफ कोविड-१९ ऑन हायअर एजुकेशन’ या शीर्षकाने ने प्रकाशित झालेल्या रिपोर्ट नुसार परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतलेल्या ४८.४६ % भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा परिणाम दिसेल. विज्ञान, तांत्रिक शिक्षण, इंजीनियरिंग, गणित या क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असतात. परंतु आता ते पुनर्विचाराच्या मानसिकतेत आहेत. तज्ञांच्या मते बहुतांश शिक्षण संस्थान ई-लर्निंग वर जोर देतील ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास व निवासासाठी होणारा दीर्घकालीन खर्चात बचत होऊ शकेल.

कोरोनामुळे शिक्षण देण्याच्या व शिक्षण घेण्याच्या पद्धतीत बदल होऊन त्याचा व्यापक परिणाम आगामी काळात दिसेल. भारतातून इतर देशात अथवा राज्यांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सामान्यत: परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च / एप्रिल महिन्यात कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेशपूर्व परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात. परंतु कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊनमुळे शिक्षण संस्था बंद आहेत. त्यामुळे नव्याने प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आलेली नाही अथवा कागदपत्रांची पूर्तता देखील करण्यात आलेली नाही. तसेच परदेशात शिक्षणासाठी प्रवेश मिळाला तरी त्याठिकाणी राहण्या खाण्याची व्यवस्था कोरोनामुळे अडचणीची ठरणार आहे. भारतात देखील अनेक विद्यापिठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेल्या आहेत. परीक्षाच झाली नसल्याने परीक्षेनंतरचा निकाल सुद्धा लांबणीवर पडला आहे. परदेशात शिक्षणासाठी विविध डिग्रीचे प्रमाणपत्रांचे ट्रान्सक्रिप्ट्स विद्यापीठांकडून तयार करून घ्याव्या लागतात. मात्र लोक्दाउनमुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्यां अशा कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय बदलला आहे.