परजातीच्या तरुणासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याप्रकरणी महिलेला पतीला खांद्यावर घेऊन चालण्याची शिक्षा

0
827

भोपाळ, दि. १४ (पीसीबी) – भोपाळमधील झबुआ जिल्ह्यात  जातीबाहेरील तरुणासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याच्या कारणावरून विवाहित महिलेला पतीला खांद्यावर  घेऊन चालण्याची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

या व्हिडीओत महिला पतीला खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहे. महिला प्रचंड दमलेली असून यावेळी ग्रामस्थ हुल्लडबाजी करत असल्याचेही दिसत आहे. महिला  आराम करण्यासाठी थांबली असता  लोक आरडाओरडा करण्यास सुरुवात करत तरुणीला पुन्हा चालण्यात भाग पाडत आहेत.

झबुआ येथील देवीगड येथे हा प्रकार घडला आहे. महिलेचा अपमान करण्यात आला आहे. सर्वांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असे  पोलीस महानिरीक्षक विनीत जैन यांनी  सांगितले.