पबजीवाला नवरा हवा म्हणून घटस्फोटाची मागणी

0
608

अहमदाबाद, दि. १७ (पीसीबी) – पबजी गेममुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचा आक्षेप याआधी घेत त्यावर बंदीची मागणी करण्यात आली होती. आता पबजी गेममुळे एक संसार मोडणार असल्याची चिन्ह आहेत. मला पबजी गेम पार्टनरसोबत लग्न करायचे असल्यामुळे घटस्फोट हवा, अशी मागणी एका महिलेने केली आहे. महिलेच्या या मागणीमुळे समुपदेशकही चक्रावले आहेत. 

समाजमनावर, कुटुंबावर ऑनलाइन गेमिंगचे कोणते चांगले वाईट परिणाम होतात हे समोर येत असते. त्यात आता या अहमदाबादमधील घटनेची भर पडली आहे. गुजरातमध्ये ‘ अभ्यम १८१’ या हेल्पलाइनवर या महिलेची तक्रार आली. याआधी या हेल्पलाइनवर पबजी संबंधित दोन महिलांनी तक्रार दाखल केल्या होत्या. या महिलांची मुले पबजीच्या आहारी गेल्याने त्यांनी मदत मागितली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाची मागणी करणारी १९ वर्षीय महिला एका बांधकाम कंत्राटदाराची पत्नी आहे. अठरा वर्ष वय असताना तिचा विवाह झाला होता. त्यानंतर या दाम्पत्याला एक मुलगी झाली. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून या महिलेने पबजी गेम खेळण्यास सुरुवात केली. पबजी खेळताना ती शहरातील एका युवकाच्या संपर्कात आली. हा युवकदेखील दररोज पबजी खेळणारा होता.

या प्रकरणातील सोनल सगाठिया यांनी सांगितले की, महिला हेल्पलाइनकडे या महिलेने घटस्फोटासाठी मदत मागितली आहे. घटस्फोटाच्या मागणीला तिच्या वडिलांनी विरोध केला. तिच्याशी समुपदेशनादरम्यान चर्चा करत तिचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर तिला तिचा नवरा मारहाण करतो का, त्रास देतो का हेही विचारण्यात आले. मात्र, तिने नवरा त्रास देत नसल्याचे सांगितले. मात्र, पबजी गेम खेळणारा जोडीदार आपल्याला आवडत असून त्याच्यासोबत राहयचे असल्याचे तिने समुपदेशकांना सांगितले.