Maharashtra

पनवेलमध्ये भाजप नगरसेवकांकडून मनसे कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला

By PCB Author

April 30, 2019

पनवेल,  दि.३० (पीसीबी) –  पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक  हल्ला केला. आठ ते दहा गुंडांना सोबत घेऊन  हा हल्ला सोमवारी (दि. २९) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड  घटनास्थळावरून पसार झाले आहेत.  या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत.  पनवेल  महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सोमवारी मतदान संपल्यानंतर  नियोजन बध्दरित्या हा हल्ला करण्यात आला आहे. कामोठे पोलिस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा  दाखल करण्यात आला  आहे.