पदार्पणात शेफाली शतकापासून वंचित

0
248

ब्रिस्टॉल (लंडन), दि.१८(पीसीबी) : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी भारताची आक्रमक सलामीची फलंदाज शेफाली वर्मा शतकापासून केवळ चार धावा दूर राहिली. इंग्लंडच्या ९ बाद ३९६ धावसंख्येला उत्तर देताना भारतीय महिलांनी जबरदस्त सुरवात केली. मात्र, अखेरच्या सत्रात त्यांनचा डाव कोसळला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ५ बाद १८७ धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौर ४, तर दिप्ती शर्मा शून्यावर खेळत होती. त्यापूर्वी इंग्लंडच्या महिलांनी आपला पहिला डाव ९ बाद ३९६ धावसंख्येवर घोषित केला.

इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी प्रतिकार केल्यानंतर आता वेळ भारतीय महिलांची होती. महिला क्रिकेटमधील सेहवाग मानली जाणारी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारताच्या डावाला सुरवात केली. खेळपट्टीचा अंदाज घेत या दोघींनी सावध सुरवात केली. पण, जम बसल्यावर शेफालीने आक्रमणाला सुरवात केली आणि पुढे जाऊन मानधनानेही तिला सुरेख साथ केली. या दोघींच्या फलंदाजीने भारताने इंग्लंडला तोडीस तोड उत्तर देण्याचा पाया भक्कम केला होता. मात्र, ही जोडी फुटल्यावर भारताचा डाव बिनबाद १६७ धावसंख्येवरून दिवस अखेरीस ७ बाद १८७ असा कोसळलेला होता.

कसोटी पदार्पण करणाऱ्या शेफालीच्या फलंदाजीत कमालीचा आत्मविश्वास होता. मात्र, तिला पदार्पण शतकाला गवसणी घालता आली नाही. शतकासाठी ४ धावा जूर असताना तिचा संयम ढासळला. या जोडीने १६७ धावांची सलामी दिली. तिने १५२ चेंडूंत १३ चौकार २ षटकारांसह ९६ धावा केल्या. त्यानंतर थोड्या वेळाने मानधनाही (७८) बाद झाली. पुढे भारताचा डाव नाट्यमयरित्या कोसळला. पूनम राऊत आणि कर्णधार मिताली राज प्रत्येकी दोन धावा काढून बाद झाल्या. शिखा पांडेला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे २ बाद १८७ वरून भारताचा डाव बाद १८३ असा अडचणीत आला. अखेरीस हरमनप्रीत आणि दिप्तीने भारताचे आणखी नुकसान टाळले.

त्यापूर्वी, पहिल्या दिवस अखेरच्या ६ बा २६९ वरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर इंग्लंडने आपला डाव ९ बाद ३९६ धावसंख्येवर घोषित केला.कालची नाबाद फलंदज सोफिया डुनक्ले आजही नाबाद राहिली. तिने १२७ चेंडूंत ७४ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड ९ बाद ३९६ घोषित (हेदर नाईट ९५, वि. टॅमी बौमॉंट ६६, सोफिया डुनक्ले नाबाद ७४, स्नेह राणा ४-१३१, दिप्ती शर्मा ३-६५) भारत ५ बाद १८७ (शेफाली वर्मा ९६, स्मृती मानधना ७८, हेदर नाईट २-१)