पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी बाबा रहीमला जन्मठेप

0
831

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी स्वयंघोषित गुरू आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला विशेष सीबीआय न्यायालयाने आज (गुरूवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्याच तब्बल १६ वर्षांनी  निकाल लागला आहे.  इतर तीन आरोपी कृष्ण लाल, कुलदीप आणि निर्मल सिंग यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

११ जानेवरीला झालेल्या सुनावणीत रोहतकच्या सुनारिया तुरुंगात कैद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले होते. राम रहीमवरील आरोप सिद्ध होऊन त्याला दोषी ठरवण्यात आले.  राम रहीमसह कृष्ण लाल, कुलदीप आणि निर्मल सिंग यांना दोषी ठरवले होते.  त्यांना जन्मठेपेसह प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पत्रकार छत्रपती यांची २००२ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. छत्रपती आपल्या वर्तमानपत्रामध्ये डेराशी संबंधित बातम्या  प्रसिद्ध करत होते. त्यातून बाबा रहिम यांनी त्यांची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणी सीबीआयने तब्बल ५ वर्षांनी २००७ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. त्यात  राम रहीमवर या हत्येचा कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.