पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी दोन संशयितांना हुबळीतून अटक

0
507

हुबळी, दि. २४ (पीसीबी) – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना (एसआयटी) विशेष तपास पथकाने हुबळीतून अटक केली आहे. आर्म्स अॅक्ट अंतर्गत ही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अमित रामचंद्र बड्डी आणि गणेश मिस्की अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना हुबळीतून अटक करण्यात आली. या दोघांना कोर्टापुढे हजर करण्यात आले असून कोर्टाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात जी एफआयआर दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये १० जणांची नावे आहेत. यापैकी निहाल अलिआस दादा अजूनही फरार आहे.