Desh

पत्नी, सुनेला दिलेल्या गिफ्टवरील करामध्ये सूट द्या – मनेका गांधी

By PCB Author

July 11, 2018

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – पत्नी किंवा सुनेला भेट दिल्या जाणाऱ्या रकमेवर कर आकारला जाऊ नये तसेच यासाठी प्राप्तिकर कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ट्विटद्वारे केली आहे.

प्राप्तिकर कायदा (१९६०) कलम ६४ नुसार कुणी पत्नीला भेट म्हणून काही दिले व त्यातून उत्पन्न होत असेल तर ते पतीच्या करपात्र उत्पन्नात गृहीत धरले जाते. तेव्हा पत्नी किंवा सुनांकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नसे. आता परिस्थिती बदलली असल्याने कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज मनेका यांनी टि्वट करून प्रतिपादित केली आहे.