पत्नी सारखे लाडू खायला देते; पतीचा घटस्फोटासाठी अर्ज

0
652

लखनौ, दि. २० (पीसीबी) – आपली पत्नी खाण्यासाठी फक्त लाडू देत  आहे. पत्नी मांत्रिकाच्या प्रभावाखाली आहे, यामुळेच ती आपल्याला वारंवार लाडू खाण्यासाठी देत  आहे, असा आरोप  उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका व्यक्तीने केला आहे. तसेच त्यांने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केला आहे.

पत्नी मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार आपल्याला जेवताना लाडू खायला देते. रोज सकाळी चार आणि संध्याकाळी चार लाडू ती खायला लावते. यादरम्यान आपल्याला इतर कोणतेही अन्न खाण्यास दिले जात नाही, असे  पतीने सांगितले.

दरम्यान, आपले  १० वर्षांपूर्वी लग्न झाले असून  तीन मुले आहेत.  आपण गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होतो. यानंतर पत्नी एका मांत्रिकाच्या संपर्कात आली होती. या मांत्रिकाने फक्त लाडू खायला घाला, असा सल्ला दिला, असे पतीने  सांगितले.