Maharashtra

पत्नीला विधानसभेची उमेदवारी द्यायला, मी अशोक चव्हाण आहे का?-  हर्षवर्धन जाधव

By PCB Author

September 30, 2018

औरंगाबाद, दि. ३० (पीसीबी)-   मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे कन्नड विधानसभेची उमेदवारी पत्नी संजना जाधव यांना देणार ,अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेत  काही तथ्य नाही.  पत्नीला विधानसभेची उमेदवारी द्यायला, मी काय अशोक चव्हाण आहे का?,  असा टोला शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लगावला.  

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना  खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लढणार असल्याची घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. त्यानंतर जाधव कन्नडमधून आपल्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांना उमेदवारी देणार असल्याची  चर्चा सुरू झाली आहे.

यावर आमदार जाधव  म्हणाले की, आमच्या घरात एकाच व्यक्तीने राजकारण करायचे  ठरले आहे. पत्नीला राजकारणात आणून किंवा निवडणुकीत उतरवून मी घर वाऱ्यावर सोडणार नाही. कन्नड विधानसभेच्या उमेदवारीवर आमची सविस्तऱ चर्चा झाली आहे. पत्नी संजना यांची देखील माझ्या निर्णयाला  परवानगी दिली असल्याचे  हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.