पत्नीला तलवारीने कापून टाकण्याची धमकी देऊन छळ करणा-या पतीसह तिघांवर गुन्हा

0
229

रहाटणी,दि.२७(पीसीबी) – ‘तू मला माझ्या मुलीला दे. नाही दिले तर मी तुम्हाला तलवारीने कापून टाकेल’ अशी धमकी माहेरी राहणा-या पत्नीला पतीने दिली. तसेच पती, सासू आणि नणंदेने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार 5 सप्टेंबर 2019 ते 26 ऑक्टोबर 2020 या कालावधीत शिवराज नगर, रहाटणी येथे घडला.

पती सुरज गुलाबचंद यादव (वय 32), नणंद गीता गुलाबचंद यादव, सासू राजकुमारी गुलाबचंद यादव (तिघे रा. शास्त्री नगर, डिलक्स चौक, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने सोमवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सुरज याने फिर्यादी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहिता तिच्या माहेरी असताना आरोपी सुरज तिथे गेला. जबरदस्तीने घरात घुसून ‘तू मला माझ्या मुलीला दे. नाही दिले तर मी तुम्हाला तलवारीने कापून टाकेल’ अशी धमकी दिली. माहेरहून काही एक आणले नाही म्हणून पती, नणंद आणि सासूने विवाहितेला वेळोवेळी टोमणे मारून शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.