संग्रहित

Pune Gramin

पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

By PCB Author

March 06, 2020

मावळ, दि.६ (पीसीबी) – पती पत्नीच्या किरकोळ वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन त्यांना गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना दि.२५ मार्च रोजी सायंकाळी १०:३० च्या सुमारास  नवलाख उंब्रे ता.मावळ, जि.पुणे येथे घडली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार एमआयडीसी तळेगाव पोलिस ठाण्यात आरोपी पती विरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्यापी अटक नाही.

  स्वप्निल शिवानंद कांबळे (वय २२ वर्षे रा. नवलाख उंब्रे ता.मावळ , जि.पुणे) असे या आरोपीचे पतीच नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी स्वप्निल हा राजू पडवळ (नवलाख उंब्रे ता.मावळ, जि.पुणे) येथे यांच्या भाड्याच्या खोलीत राहत असताना सदर फिर्यादी आणि स्वप्निल यांच्यात किरकोळ वाद झाला होता. तोच राग मनात धरून फिर्यादीच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना गंभीर जखमी करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला हि घटना दि.२५ मार्च रोजी सायंकाळी १०:३० च्या सुमारास राजू पडवळ (नवलाख उंब्रे ता.मावळ, जि.पुणे) याच्या रूम मध्ये घडली. असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी फिर्यादीची तक्रारीची दखल घेत आरोपी पती विरोधात एमआयडीसी तळेगाव पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्ना खालील गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस अधिकारी पाटील करीत आहेत.