Pune

पत्नीची RTI कार्यकर्त्याला मारहाण; पतीचा घोटाळा लपवण्यासाठी पत्नीचा खटाटोप

By PCB Author

November 17, 2021

पुणे, दि.१७ (पीसीबी) : पुणे महापालिकेत अधिकारी असणाऱ्या पतीने केलेला घोटाळा लपवण्यासाठी पत्नीने हे प्रकरण शोधून काढणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना गाठून त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र दीक्षित त्यांच्यासोबत शुक्रवारी हा प्रकार घडला.

पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन 7 मध्ये 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शैलेंद्र दीक्षित यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी माहिती मागवली होती. मात्र हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्याच्या पतीने शैलेंद्र यांना मारहाण केली. महापालिका कार्यालयातच पत्नीने चपलेने मारायला सुरुवात केली. पती विरुद्ध अपील का केले याचा राग मनात धरून पत्नीने हे प्रकरण चांगलेच पेटवले. 12 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी याप्रकरणी अपील सुरू असताना हा प्रकार घडला. संबंधित अभियंत्याच्या पद्धतीने महापालिकेच्या कार्यालयात घुसून माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण तर केलीच शिवाय मला धक्का मारला असा बहाणा करून कार्यकर्त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आपण केलेला गैरव्यवहार लपवण्यासाठी संबंधित कनिष्ठ अभियंता त्यानेच पत्नीला कार्यालयात बोलावल्याचा आरोप शैलेंद्र यांनी केला आहे.