पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन पळवला

0
309

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तीन चोरट्यांनी एकाचा मोबईल फोन आणि हेडफोन चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता वाकड येथे बेंगलोर-मुंबई महामार्गावर घडली.

अमोल संजय चरपे (वय 34, रा. वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी चरपे घरी जात होते. ते बेंगलोर-मुंबई महामार्गावर फोक्सवॅगन कंपनीसमोर वाकड येथे आले असता अनोळखी तीनजण त्यांच्याजवळ एका दुचाकीवरून आले. तिघांनी चरपे यांचे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष विचलित केले. त्यानंतर आरोपींनी चरपे यांच्या टीशर्टच्या खिशातून मोबईल फोन आणि हेडफोन असा एकूण सात हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.