पत्ता विचारणा-या तरुणावर कोयत्याने वार

0
653

थेरगाव, दि. ८ (पीसीबी) – मित्राला भेटण्यासाठी जात असलेल्या एका तरुणाने गल्लीतील काही तरुणांना पत्ता विचारला. त्यावरून तिघांनी मिळून त्या पत्ता विचारणा-या तरुणाला मारहाण करत कोयत्याने वार केले. ही घटना 26 सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता घडली असून याबाबत 7 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश कंस गलांडे (वय 21, रा. थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज चंदनशिवे, संदीप चौधरी आणि एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गलांडे त्यांचा मित्र इकबाल शेख (रा. जगतापनगर, थेरगाव) याला भेटण्यासाठी जात होते. जगताप नगर मधील लेन नंबर पाच येथे थांबलेल्या तिघांना गलांडे यांनी पत्ता विचारला. त्यावरून आरोपींनी गलांडे यांना पत्ता न सांगता थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गलांडे तिथून निघून गेले.
मित्राला भेटून अर्ध्या तासानंतर ते परत जाऊ लागले. त्यावेळी आरोपींनी गलांडे यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याने वार करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.