Bhosari

पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By PCB Author

February 24, 2021

चिखली, दि. 24 (पीसीबी): पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2016 पासून 14 फेब्रुवारी 2021 या कालावधीत वेळोवेळी चिखली परिसरात घडला आहे.

याबाबत 35 वर्षीय पीडित महिलेने 23 फेब्रुवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या कुटुंबासोबत ओळख करून आरोपीने महिलेशी जवळीक साधली. महिलेच्या पतीला त्वचेचा त्रास असल्याने आरोपी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असत. त्यातून आरोपीने पीडित महिलेशी जवळीक वाढवली. तसेच सन 2016 ते 14 फेब्रुवारी 2021 या कालावधीत आरोपीने पीडित महिलेच्या पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.