Pimpri

पतीला दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीवर ब्लेडने वार

By PCB Author

October 21, 2020

देहूरोड, दि. २१ (पीसीबी) – पतीला दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून त्याने पत्नीवर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 19) पहाटे सव्वा तीन वाजता मरिमाता मंदिराजवळ, देहूरोड येथे घडली.

संगीता लखन गायकवाड (वय 25, रा. मरिमाता मंदिराजवळ, देहूरोड) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी याबाबत मंगळवारी (दि. 20) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लखन सोपान गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन आणि फिर्यादी संगीता हे पती-पत्नी आहेत. लखन याने संगीता यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. संगीता यांनी पैसे दिले नाहीत. यावरून लखन याने संगीता यांना हाताने मारहाण केली. तसेच धारदार ब्लेडने वार केले. यामध्ये संगीता यांच्या डोळ्यावर, कपाळावर, हातावर गंभीर दुखापत झाली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.