Desh

पतीकडून शारिरीक छळ,’ अभिनेत्रीने मागितली मोदींकडे मदत

By PCB Author

October 15, 2019

नवी दिल्ली, दि.१५ (पीसीबी) – भोजपूरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा विजय ठक्कर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिचा रडत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहा तिच्या पती विरुद्ध तक्रार करताना दिसत आहे. तसेच तिने भारतीय कायदा व्यवस्था कुचकामी असल्याचेही म्हटले आहे.

नेहा या व्हिडिओद्वारे तिच्या पतीने तिला कशाप्रकारे वागणूक दिली, हे सांगताना दिसत आहे. तिचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तिने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांच्या शुभेच्छाही मिळवल्या होत्या. परंतु काहीच आठवड्यांत तिचा सुखी संसार मोडीत निघाला. तिच्या पतीने तिच्यावर शारीरीक अत्याचार करण्यास सुरुवात केली. तसेच तिला घरातून बाहेर काढले. सध्या तिचा पती अमेरिकेत राहात आहे. तो तिला स्वत:बरोबर घेऊन जाण्यास तयार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून तो खोटी आश्वासने देत आहे. या नंतर तिने पोलिस तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनीही तिला मदत करण्यास नकार दिला. अभिनेत्री नेहाने फेसबुक व्हिडीओव्दारे असे आरोप आपल्या पतीवर केले आहेत. दरम्यान तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना केली आहे.