Chinchwad

पतंग उडविण्यावरून 15 वर्षीय मुलाला मारहाण

By PCB Author

January 10, 2022

निगडी, दि. १० (पीसीबी) – पतंग उडवताना भांडण करून एकाने 15 वर्षीय मुलाला पंतंगाचा दोरा गुंडाळण्याची भिंगरी मारून जखमी केले. ही घटना शनिवार (दि. 8) दुपारी साडेचार वाजता पंचतारानगर, आकुर्डी येथे घडली.

आदित्य संतोष जैसवाल (वय 15, रा. आकुर्डी) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लखन उर्फ लख्या कवडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचार वाजता फिर्यादी आणि त्यांचे मित्र पंचतारानगर, आकुर्डी येथील गंगाई गार्डनजवळ पतंग उडवण्यासाठी गेले. फिर्यादी आणि त्यांचे मित्र पतंग उडवत असताना आरोपी लखन तिथे आला. त्याने फिर्यादी यांना ‘तू आमच्या एरियात पतंग उडवण्यासाठी का आला’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर पतंगाचा दोरा गुंडाळण्याची लाकडी भिंगरी फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.