Maharashtra

‘….पण मी येणार म्हणताच त्या गावात गावबंदी आणि घरबंदी जाहीर केली’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By PCB Author

June 06, 2021

मुंबई, दि.०६ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या अलिबागमधील कोर्लई गावातील बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी जाणार होतो. तसे प्रशासनाला कळवलंही होतं. पण मी येणार म्हणताच कोर्लई गावात गावबंदी आणि घरबंदी जाहीर करण्यात आली. मला गावात येण्यापासून रोखण्यासाठीच कोरोनाचं कारण देऊन ही गावबंदी करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच रायगड, महाराष्ट्रासह देशात अशाप्रकारची गावबंदी कुठे आहे?, कोर्लईतच गावबंदी का?, असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत आहे, असं मी 1 जून रोजी कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना कळवलं होतं. त्यावर मला प्रशासनाने 4 जून रोजी गावबंदी आणि घरबंदीचा काढण्यात आलेला आदेश मला पाठवण्यात आला. त्यात कोर्लई गावातून बाहेर पडण्यास तसेच इतर गावातून कोर्लईत येण्यास प्रतिबंध लादला गेला आहे. तसेच गावातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही 28 दिवसापर्यंत हा लॉकडाऊन, गावबंदी कायम राहील, असं अलिबाग प्रशासनाने या आदेशात म्हटलं आहे. 3 जूनला रोजीच हा आदेश काढण्यात आला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.

कोर्लई गावात कोरोनाचा नावाने १०० दिवसाची घरबंदी, गावबंदी

गावचा शेवटचा कोरोना रुग्ण बरा होऊन नंतर 28 दिवस पर्यंत लॉकडाऊन असा आदेश

मी कोर्लई तहसीलदार… अधिकाऱ्यांना श्री उध्दव ठाकरे चा 19 बंगलांचा घोटाळा चा पाठपुरावा साथी येणार असे कळविले होते, आता हा गाव बंदी चा आदेश pic.twitter.com/iVwWbNKLUc

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 6, 2021

या आदेशानुसार कोर्लई गावात 100 दिवसांची घरबंदी, गावबंदी राहणार आहे. गाव कोरोनामुक्त झाल्यानंतरही 28 दिवस गावबंदी करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणत्या कायद्यांतर्गत मिळाला आहे? रायगड सोडा महाराष्ट्र आणि देशात अशा प्रकारची गावबंदी कुठे घालण्यात आली आहे? हे मला दाखवून द्या, असं सांगतानाच ही गावबंदी बेकायदेशीर आहे, असं ते म्हणाले. मी ठाकरे, वायकर परिवाराच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येत असल्याने प्रशासनाने आदेश काढला, असे मला म्हणायचे नाही. परंतु गावकऱ्यांवर अशा प्रकारचा अत्याचार, सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला? हा माझा ठाकरे सरकारला प्रश्न आहे, असं ते म्हणाले. कोरोना उपचाराला प्राधान्य देणं ही आमचीही जबाबदारी आहे. परंतु, कोर्लईत सत्तेचा राक्षसी दुरुपयोग करण्यात आला असून त्याचा पुनर्विचार व्हावा. लोकडाऊन 7-7 दिवसाचे असतात असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाईसाठीच आहेत का?, असा सवालही त्यांनी केला.