Maharashtra

…पण कोण समाजाला मदत करतो, तर त्यात ह्यांना राजकारण दिसतं – निलेश राणे

By PCB Author

January 17, 2020

मुुंबई,दि.१७(पीसीबी) – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या सांगली बंदच्या हाकेमागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचं म्हणत भाजपवर निशाणा साधला होता. यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.

मराठा समाज अडचणीत असतो तेव्हा हे काही बोलत पण नाही आणि काही करत पण नाही. पण कोण समाजाला मदत करतो तर त्यात ह्यांना राजकारण दिसतं, असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

मराठा समाज अडचणीत असतो तेव्हा हे काही बोलत पण नाही आणि काही करत पण नाही पण कोण समाजाला मदत करतो तर त्यात ह्यांना राजकारण दिसतं. https://t.co/YWmYgmQInM

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 17, 2020

मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे.सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचं मला वाटतं. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.