Maharashtra

पण कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठीशी आहोत – संजय राऊत

By PCB Author

August 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज ईडी कडून चौकशी सुरू आहे. यावरच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आम्ही सतत भांडत असतो. पण कुटुंब म्हणून आम्ही राज ठाकरेंच्या पाठीशी आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आम्ही राजकारणात विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. इडीची नोटीस हे संकट नाही तर ही प्रोसेस आहे. मला वाटत नाही या चौकशीमधून काहीही बाहेर येईल, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंना ईडीची नोटीस जरी आली असली तरी मला त्यातून काही निघेल असे वाटत नाही, असे उद्धव ठाकरेंनी देखील म्हटले आहे.