“पण असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये”

0
413

मुंबई,दि.९(पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही मोफत वीज मिळण्याचं बोललं जात होतं. यावर शंभर युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याबाबतचं वृत्त वाचलं. पण असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये, असं म्हटलं आहे.

अजित पवार यांनी राज्य सरकारकडून उद्योगांना विजेसाठी आकारण्यात येणाऱ्या दराबाबत आढावा घेण्यात येत आहे. वीजदरावर आकारण्यात येणाऱ्या करात कपात केली तर राज्य सरकार किती भार सोसू शकतं?, हे पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकारतर्फे २०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाते. त्याचाच आदर्श घेत राज्यात २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा विचार आहे. मात्र सध्या १०० युनिटपर्यंत वीज या वर्षाच्या शेवटपर्यंत ग्राहकांना दिली जावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.