पटत नसले, तरी समर्थनार्थ बोलावे लागते – नारायण राणे   

0
922

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  आमदार झालो तेव्हा मंत्री व्हावे असे वाटत  होते. मंत्री झालो तेव्हा मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत होते. आता खासदार झालो पण माझ्या मर्जीने झालो नाही. माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जात आहे. याचे दु:ख वाटत आहे. पटत नसले तरी समर्थनार्थ बोलावे लागत आहे, अशी खंत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.

नारायण राणे यांच्या ‘नो होल्डस् बार्ड’ या इंग्रजीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे यांच्या  उपस्थितीत करण्यात आले.  यावेळी नारायण राणे बोलत होते.

मी पुस्तक लिहिताना सावधगिरी बाळगली आहे. काही गोष्टी टाळल्या आहेत. शिवसेनेत आता काही नाही आता सगळे संपले आहे, असे नारायण राणे म्हणाले.

राणे पुढे म्हणाले की,  आम्ही पक्ष वाढवायला आणि पक्ष वाचवायला काम केले. पण आता शिवसैनिक ते करू शकणार नाहीत. आता शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत. आम्हाला तर त्यावेळी वडापावही मिळायचा नाही, असे  राणे यांनी सांगितले.