पक्ष विलीन करण्याआधी नारायण राणेंनी जाहीर केली नितेश राणेंना भाजपची उमेदवारी  

0
407

सिंधुदुर्ग, दि. १८ (पीसीबी) – आमदार नितेश राणे  कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील, अशी घोषणा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती आणि जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच राणेंनी आपल्या मुलाला भाजपकडून उमेदवारी जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नारायण राणे यांचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असेल. त्यामुळेच त्यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला असेल. आपल्याला वरिष्ठ पातळीवरील चर्चेबाबत काही कल्पना नाही, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. पक्ष विलीन करण्याचा निर्णय नारायण राणे यांचा असून आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या आदेशाचे पालन करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या ताठर भूमिकेमुळे नारायण राणे यांचा बहुप्रतिक्षित भाजप प्रवेश वेटींगवर राहिला आहे. पण राणे यांनी    आपण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार आहोत, तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहोत, अशी घोषणा मंगळवारी केली आहे. परंतु पक्ष विलीन करण्याआधी त्यांनी आपल्या मुलाची भाजपकडून उमेदवारी जाहीर केल्याने युतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.