Maharashtra

पक्ष योग्य तो निर्णय घेऊ शकतो – एकनाथ खडसे

By PCB Author

March 12, 2020

मुंबई, दि.१२ (पीसीबी) – राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुका होत आहेत. या जागांसाठी प्रत्येक पक्षातून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे.

त्यामुळे पहिल्या यादीत नाव न आल्याने दुसऱ्या यादीत नाव येईल, अशी अपेक्षा असताना खडसेंची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. भाजपने उदयनराजे भोसलें आणि रामदास आठवले यांना पहिल्या यादीत स्थान दिले. तर राहिलेल्या एकमेव जागेवर डॉ. भगवत कराड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपने विविध राज्यांमधील पाच उमेदवारांच्या नावाचं प्रसिद्धपत्रक जारी केलं. यामध्ये महाराष्ट्रातून डॉ.भागवत कराड यांचा समावेश आहे.

‘मला राज्याच्या राजकरणात रस आहे केंद्रात नाही. राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा असली तरी माझे नाव येईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र पक्ष योग्य तो निर्णय घेऊ शकतो.’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.