Maharashtra

पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे – सुप्रिया सुळे

By PCB Author

February 21, 2020

औरंगाबाद,दि.२१(पीसीबी) – पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे, पक्षाची बदनामी कराला तर गाठ माझ्याशी आहे, असा दम राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुळे यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना भरला आहे. सुप्रिया सुळे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी पैठणमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सुळे यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दम भरला आहे.

पैठणमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी पाहायला मिळाली. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी तुफाण घोषणाबाजी करत राडा घातला. या राड्यानंतर सुळे यांनी वाकचौरे आणि गोर्डे यांना जायला सांगितलं.

सुप्रिया सुळे व्यासपीठावर उपस्थित असतानाच संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी सुळे चांगल्याच संतापल्या. तसेच काहीकाळ त्यांना त्यांचे भाषण थांबवावे लागले.