पक्षातील माणूस कसा मोठा होणार नाही हे मी आठ दिवसांपासून अनुभवत आहे –  सुधीर मुनगंटीवार

0
1583

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – राजकीय नेत्यांची संवेदनशीलता संपत चाललेली आहे. पक्षातील माणूस कसा मोठा होणार नाही, यासाठी पक्षात आज स्पर्धा सुरू आहेत. गेल्या आठ दिवसांपासून आपण हे अनुभवत आहे, अशी खंत अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. दुसऱ्या पक्षातील माणसाला कशी मदत करायची हे आर आर पाटील यांच्याकडून अनुभवले असे मत मुनगंटीवर यांनी व्यक्त केले आहे. सांगलीतील आर आर पाटील यांच्या स्मारक भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

आबा हे नेहमीच निवडणूक हे बाय प्रोडक्‍ट समजायचे. आबांना जी खाती मिळाली त्याचे त्यांनी सोने केले.कारण आबा हा माणूस परिस होते असे मुनगंटीवार म्हणाले. आज जर आबा विधानसभेत असते तर सत्ताधाऱ्यांना नाकी नऊ केले असते या जयंत पाटील यांच्या विधानावर ते म्हणाले, की जयंतराव पाटील यांचा पॉझ म्हणजे आर आर पाटील यांच्याशिवाय आता तुमचे सरकार येऊ शकत नाही आणि दुसरा अर्थ म्हणजे पुढील सरकार आमचेचे येणार हे स्पष्ट होते. आज पक्षातील माणसे पक्षातील माणसाला मोठे होऊ देत नाहीत, हे मी गेल्या आठ दिवसांपासून अनुभवत आहे,मात्र दुसरी कडे आबा सारखा माणूस दुसऱ्या पक्षात राहून मदत करण्याची नेहमी भावना ठेवत असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, की आबांचे जाणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आबा विधानसभेत असते तर सत्तारूढ पक्षाला नाकी नऊ आले असते.आबांचे अचानक निघून जाण्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची खूप मोठी हानी झाली, या वेळी व्यासपीठावर असणाऱ्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर मिशकील टीका केली. दीपक केसरकर यांच्या कडे बघितल्यावर इतका गरीब माणूस मंत्री कसा असू शकता अस खोचक प्रश्न उपस्थित करत,केसरकर हे नम्रतेचा कळस आहे असे सदाभाऊ म्हणाले.