पं. दीनदयाल उपाध्याय यांना शहर भाजपकडून अभिवादन

0
212

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव तसेच समाजापुढे एकात्ममानववादाचा सिद्धांत मांडणारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शहर भाजपच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथे शनिवारी (दि.२५) भाजपा पक्ष कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, महापौर माई ढोरे, उपमहापौर नानी घुले, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी महापौर राहुल जाधव, माजी उपमहापौर तुषार हिंगे, प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, शहर उपाध्यक्ष किसन बावकर, राजेंद्र बाबर, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, युवा मोर्चा उपाध्यक्ष रवी जांभुळकर, नितीन अण्णा धोत्रे, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळीग्राम, कार्यालय प्रमुख संजय परळीकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पं.दीनदयाल भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. त्यांनी दिलेल्या तत्वावर भारतीय जनता पक्ष चालत असून समाज आणि देशाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार असल्याच्या भावना यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले तर आभार सरचिटणीस विजय फुगे यांनी मानले.