पंधरा वर्षांपूर्वीच मला मुख्यमंत्री का केले नाही? – खासदार उद्यनराजे  

0
748

सातारा, दि. १३ (पीसीबी) – मला जर मुख्यमंत्री व्हायचे असते, तर त्यासाठी प्रयत्न मी केव्हाच केले असते आणि जर मुख्यमंत्री करायचेच होते, तर पंधरा वर्षांपूर्वी करायचे होते. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात आमचीच सत्ता होती, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. 

खासदार उदयनराजे यांनी आज ( गुरुवार) साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली.  यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर  भाष्य केले. उद्यनराजे म्हणाले की, मी मुख्यमंत्री व्हावे, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु चार भिंतीच्या आत काम करायला मी काय कारकून आहे का? जे मला जमणार नाही ते मी करणारही नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावर उद्यनराजे म्हणाले की, स्वतःला भगीरथ म्हणवून घेणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना काहीच काम केले नाही. मंत्रीपदी असताना लाल दिव्याच्या गाडीचा वापर फक्त लोकांना हिणवण्यासाठी केला, त्यांना आता देवसुद्धा क्षमा करणार नाही, अशी टीका त्यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली.