पंतप्रधान मोदींनी पाच राज्यांच्या निकालावर बोलणे टाळले

0
722

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – हिवाळी अधिवेशनाला आजपासून (मंगळवार)  सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांवर बोलणे त्यांनी स्पष्टपणे टाळले. यावरुन भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे स्पष्ट होत आहे.

यावेळी मोदी म्हणाले की, अधिवेशनात जास्तीत जास्त लोकहिताची कामे करु. सर्व सदस्य या भावनेचा आदर करत पुढे जातील, अशी अपेक्षा आहे. सरकार जनहिताची अनेक विधेयके आणणार आहे. यावर चर्चा व्हावी. वाद, विवाद होत असले तरी संवाद झालाच पाहिजे,  असे मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सर्वांचे लक्ष पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागून राहिले आहे. भाजपला खूप मोठा धक्का बसेल, असे आतापर्यंतच्या  निकालावरून बोलले जात आहे. तर काँग्रेसला संजीवनी मिळण्याची शक्यता आहे.