Notifications

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी; निवडणूक निरीक्षक अधिकारी निलंबित

By PCB Author

April 18, 2019

भुवनेश्वर, दि. १८ (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी) सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या विमान अथवा हेलिकॉप्टरची तपासणी करू नये, असा स्पष्ट नियम केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिला आहे. तरीही निवडणूक प्रचार सभेसाठी ओडिशातील संबळपूरमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक निरीक्षक मोहम्मद मोहसीन यांनी तपासणी केली होती.