पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण  

0
752

अहमदाबाद, दि. ३१ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याचे  आज (बुधवार) बटन दाबून अनावरण करण्यात आले. यावेळी या पुतळ्याच्या निर्मितीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची एक चित्रफित दाखवण्यात आली.

वल्लभभाई पटेल  यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जगातील या सर्वात उंच पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान या लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी पार पाडली.

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया परिसरात हा जगातील सर्वाधिक पुतळा साकारण्यात आला आहे. संपूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायची असेल, तर त्याचा तिकीट दर ५०० रूपये आहे. तर या पुतळ्यापासून ३ किलोमीटर अंतरावर वाहने पार्क करावी लागणार आहेत. तर तेथून बसची सोय करण्यात आली आहे.