पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त संजय लीला भन्साली यांची खास भेट  

0
348

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी खास भेट  दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित ‘मन बैरागी’ या विशेष चित्रपटाचा फर्स्ट लूक आज ( मंगळवार)  प्रसिध्द करण्यात आला.  

नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील न पाहिलेले, ऐकलेले प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. संजय लीला भन्साली आणि महावीर जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक संजय त्रिपाठी आहेत. या सिनेमाच्या फर्स्ट लूक पोस्टर  अभिनेता प्रभासने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.

संजय लीला भन्साली यांनी या सिनेमाबाबत माहिती देताना म्हणाले की, ही न ऐकलेली कहाणी आहे, जी सांगायला हवी. यामधील आवाहन आणि संदेश हे कहाणीचे वैशिष्ट्य आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल.

दिग्दर्शक संजय त्रिपाठी म्हणाले की, माझ्यासाठी ही अशा माणसाची कहाणी आहे, जो स्वत:चा शोध घेण्यासाठी निघाला होता आणि मग आपल्या देशाचा सर्वात मोठा नेता बनला.