पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत गरिबीतून बाहेर पडत आहे – डोनाल्ड ट्रम्प

0
420

गांधीनगर,दि.२४(पीसीबी) – ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामधून ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत गरिबीतून बाहेर पडत आहे. मोदी ज्या प्रकारे देशाला पुढे घेऊन जात आहेत ते निश्चितच प्रेरणादायी आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आगमनावेळी त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले. यावेळी मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांनी उपस्थितांना संबोधित केलं. एक चहावाला देशाचा पंतप्रधान होणं हे कौतुकास्पद आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेने तुमच्या महान पंतप्रधानांचे टेक्सासमधील भव्य फुटबॉल स्टेडियमवर स्वागत केले होते. आज अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आमचं स्वागत होत आहे. भारतीय जनतेने जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे, असंही ते म्हणाले आहेत.