पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता देशवासीयांचा उत्तम प्रतिसाद

0
327

 

मुंबई, दि.६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटे वाटू नये, खंबीर रहावे म्हणून आज रविवार ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन केल होत. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता देशवासीयांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घराघरात दिवे पेटवले होते, काहींनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केले होते, काहींनी मेणबत्त्या पेटवल्या होत्या तर काहींनी टॉर्च लाऊन यात सहभाग नोंदवला.

काल रात्री ९ वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून जनतेने मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. तसेच आपले दिव्याच्या सोबतचे फोटो सोशल मिडियावर टाकण्यासही सुरवात सहभागींनी केली आहे.