Desh

पंतप्रधान मोदींची प्रशंसा काँग्रेसच्या शशी थरूरांना भोवणार

By PCB Author

August 27, 2019

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची   प्रशंसा केली जावी,  असे विधान केल्याने   काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या विधानाबद्दल केरळ काँग्रेसने खासदार थरूर यांना स्पष्टीकरण मागितले  आहे.

खासदार शशी थरूर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना,  आपल्याला पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली पाहिजे. यामुळे ते जेव्हा चुका करतात तेव्हा आपण केलेल्या टीकांची विश्वासर्हता कायम राहते, असे म्हटले होते. त्यांच्या या  विधानावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी  नाराजी व्यक्त केली होती.

आता या विधानाबाबत खासदार शशी थरूर यांच्याकडे केरळ काँग्रेसने स्पष्टीकरण मागितले   आहे. पंतप्रधान यांच्या प्रशंसेच्या वक्तव्याबाबत आम्ही शशी थरूर यांना स्पष्टीकरण मागणार आहोत, त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढील कारावाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे केरळ काँग्रेसचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले.