पंतप्रधान निधीसाठी डीडी नॅशनलवर जहिरात होतीये मग मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी का होऊ नये? – संजय राऊत

0
428

मुंबई,दि.१२(पीसीबी) – पंतप्रधान निधीसाठी डीडी नॅशनलवर जहिरात होतीये मग मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी का होऊ नये? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

कोरोना महामारीने सगळा देश त्रस्त झाला आहे. सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर मोठं काम करते आहे. पण यामध्ये लोकांनी देखील आर्थिक मदत करून आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत. पंतप्रधान निधीमध्ये आपली रक्कम जमा करण्याचं आवाहन मोदी करत आहेत. तर विविध राज्य सरकारं त्यांच्या त्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याचं आवाहन करत आहे. याच रिलीफ फंडावर आणि त्याच्या जहिरातबाजीवर संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. डीडी नॅशनल वर दर 2-3 मिनिटाला पंतप्रधान निधीसाठी जाहिरात होत आहे मग राज्य सरकारला डीडी सह्याद्रीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहीरात करायला काय हरकत आहे?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करून डीडी सह्याद्रीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जहिरात का करू नये, असं म्हटलं आहे.

दरम्यान, सुरूवातीच्या काळात पंतप्रधान केअर फंडावरून बरीच उलट सुलट चर्चा सुरू होती. शिवसेनेने देखील त्यावर बोट ठेवलं होतं. अगोदर पंतप्रधान रिलीफ फंड असताना आता केअर फंड काढायची गरज होते का? असं त्यांनी म्हटलं होतं.