पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातलं सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत – शिवसेना

0
421

मुंबई, दि.१(पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातलं सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत, असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना’च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे. तसेच सरकारच्या कारभारावर टीका देखील करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे आणि त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहे, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून मोदींचं कौतुक करण्यात आलंय.

दरम्यान मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? असा सवाल करत शिवसेनेनं सरकारवर टीकास्त्र देखील सोडलं आहे.