पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी देशाला संबोधित करणार

0
235

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत. सध्या देशात लॉकडाऊन ५.० सुरु आहे. देशात अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. ट्रेन, विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाली नसली, तरी मेट्रो, रस्त्यावरील वाहतूक, हॉटेल, सिनेमा हॉल सुरु झाले आहेत.

सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे. पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण आहे. सणांचे हे दिवस देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. लॉकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण अजूनही अर्थव्यवस्थेची गाडी पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सणवाराच्या या काळात मोठी उलाढाल अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काय घोषणा करणार? नवीन पॅकेज जाहीर करणार का? कर्जदारांना दिलासा मिळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या मोदींच्या संबोधनात अपेक्षित आहेत.
सण-उत्सावाच्या या कळात करोनाचा फैलावही वेगाने होण्याची भीती आहे. त्यामुळे मोदी त्या दृष्टीने काय बोलतात, हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.