पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या भावासारखे- उद्धव ठाकरे

0
375

अमरावती, दि. १६ (पीसीबी) – शिवसेना व भाजपमध्ये सत्तेत आल्यानंतर अनेक वाद झाले. दोन्ही पक्षातून मनात नसतानाही म्यानातील तलवारी काढण्यात आल्या. आता मनातील व म्यानातील तलवारी ठेवण्यात आल्या आहेत. युतीचा वाद संपुष्टात आला असून एकदिलाने लढायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर मोठे भाऊ वाटावे असेच व्यक्तिमत्वआहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी सरकारविरुद्ध तोफ डागणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा सूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलल्याचे दिसून आले.

अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारी विभागीय लोकप्रतिनिधी व पदाधिकारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पालकमंत्री प्रवीण पोटे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार प्रताप जाधव, संजय धोत्रे, भावना गवळी, आमदार डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, रमेशचंद्र बुंदीले, प्रभुदास भिलावेकर, प्रकाश भारसाकळे, चैनसुख संचेती, राजेंद्र पाटणी, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान युतीच्या प्रचाराचा नारळ फुटला.