पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थीत होणार, उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
1431

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – काही आठवड्यावर विधानसभा निवडणूक आली आहे. परंतू राष्ट्रावादी काँग्रेसची आऊटगोइंग काय थांबता थाबेना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे उदयनराजे राजे यांचा प्रवेश झालाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थीत होणार असल्याची माहीती समोर आली आहे.  

उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर मंगळवारी सायंकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. खासदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याची देखील उदयनराजेंची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या अगोदरच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने सातारमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती. त्यात आता जर उदयनराजे भोसले यांनी असा काही निर्णय घेतला तर साताऱ्यामधून राष्ट्रवादीचा नायनाटच होणार असल्याचे दिसते.