पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लडाख दौऱ्याने चीनची पाचावर धारण – धुमश्चक्रीत जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन मोदींकडून विचारपूस

0
301

श्रीनगर, दि. ३ (पीसीबी) : चीनसोबत तणाव वाढला असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेह लढाखचा दौरा केला. चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान लेहमध्ये दाखल झाले. थेट पंतप्रधानांनी सीमा भागात केलेला दौरा भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढवणारा तर आहेच, मात्र चीनची पाचावर धारण बसणार आहे. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन मोदींनी विचारपूस केली. पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावतदेखील लेह दौऱ्यावर आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना थेट पंतप्रधान तिथे पोहोचल्याने भारताची आक्रमक भूमिका दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे महत्त्व का?
1. भारत-चीन तणाव लवकर न निवळल्यास, लडाखमध्ये केलेले अतिक्रमण परतवून लावू, हा चीनला थेट इशारा
2. शेजारी देशांसोबत सीमेवर तणाव असताना पंतप्रधानांनी दौरा करण्याची पहिलीच वेळ
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेचा आढावा घेतल्याने भारत कोणत्याही संघर्षाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत
4. प्रत्यक्ष पंतप्रधान आल्याने सीमावर्ती भागात तैनात असलेल्या, निधड्या छातीने लढा देणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावले
5. मोदींनी विचारपूस केल्याने गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी जवानांचे मनोधैर्यही वाढले
6. भारताचे पंतप्रधान सीमेवर येऊ शकतात, मग आपले का नाही, आपल्या देशाने वाऱ्यावर सोडल्याची भावना चिनी सैनिकांमध्ये निर्माण होऊ शकते, असं संरक्षण तज्ज्ञांचं मत
7. भारत आपल्या जवानांना मान देतो, हे चीनच्या जनतेच्या मनावर ठसवण्याचे मोदींचे कूटनीती हत्यार
8. जवळपास 130 देश चीनच्या विरोधात असल्याने चीनचे मनोबल आणखी खच्ची करण्याची नामी संधी
9. 1962 मध्ये तत्कालीन पंतप्रधान, संरक्षण मंत्री सीमेवर आले नव्हते, मात्र आता परीस्थिती तशी नाही, सरकार सैनिकांच्या मागे, ही भावना रुजवल्याचे संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांचे मत
10. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पंतप्रधान मोदींसह मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे हे एकाचवेळी दाखल झाल्याने, भारताची आक्रमक भूमिका दिसून येते